ईशा बी. ए च्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. लवकरच तिचे शिक्षण पूर्ण होणार होते. परीक्षा नुकत्याच झाल्या आणि बघता बघता निकालाचा दिवस जवळ आला. ईशा तिच्या यंदाच्या निकालासाठी अतिशय ठाम होती. पेपर सगळेच चांगले गेले होते आणि तिचा आत्मविश्वास ही आकाशाला भिडला होता. ईशा आज ही नेहमी प्रमाणे तिच्या डायरीत वेगवेगळ्या नोंदी करून ठेवत होती. तिला भेटलेल्या युनिक व्यक्तीला ती शब्दात उतरवत होती. कधी सिनेमात, कधी नाटकात तर कधी पुस्तकात ती त्यांना शोधत असे. असेच एक निराळे व्यक्तिमत्व तिला इंग्रजी कादंबरीत मिळाले.
त्याचे वेगळेपण असे की हा एक लेखक होता. त्याच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने खूप काही लिहून ठेवलेल्या गोष्टी होत्या, प्रसंग होते. पुढे कालांतराने त्याने लिहिलेले काही काल्पनिक प्रसंग त्याच्या समोर घडू लागले. त्याच्या सोबत ही घडू लागले. तोच त्याचा साक्षीदार होता. त्याने लिहिलेल्या गोष्टी नुसार एकदा तो आणि त्याची बायको सोबत फिरायला गेल्या असताना अकस्मात त्यांचा अपघात झाला. अगदी त्याने शब्दात वर्णन केले त्याच प्रमाणे घडले होते. त्या नंतर या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले तेव्हा त्याने लिहिलेलं हर एक पान त्याने वाचले आणि भूतकाळात घडलेले प्रसंग आठवले. योगायोगाने ते जवळ जवळ सारखेच होते. त्याची त्याला प्रचिती येत गेली. कालांतराने त्याला या गोष्टीचा पश्चाताप ही झाला. असा एक अवलिया लेखक तिला एका पुस्तकात मिळाला. तिने तो तितक्याच रंजकतेने लिहून काढला. लिहिलेली ही सगळी पात्र तिला काही सुचवत असायची. त्याचा ती मागोवा घेण्यात गुंतलेली असायची.
पाहता पाहता निकालाचा दिवस उजाडला. शेवटच्या सेमिस्टरचा निकाल लागला. ती उत्साहात कॉलेज मध्ये गेली. गेल्या गेल्या तिची मैत्रीण नलिनी वाटेत भेटली. तिने ईशा च्या नावापुढे एफ पाहिलेले, एफ म्हणजे फेल. हे तिने ईशा ला सांगितले. ईशाला तिच्या बोलण्यावर आधी विश्वास बसत नव्हता. तिने स्वतः पाहिले तेव्हा तिला धक्का बसला. तिथेच ती रडू लागली. एका पेपरमुळे हे अपयशाचे दुःख तिच्या पदरात पडले होते. नलिनीने तिला धीर दिला पण तिचे रडू थांबतच नव्हते. नलिनी तिला घरी घेऊन आली. घरी तिची आई कामात होती. हातातले काम सोडून ती बाहेर आली. ईशाचा पडलेला चेहरा पाहून तिने पहिला प्रश्न हाच विचारला " काय लागला निकाल ? काय झालं ? " ईशा आणि नलिनी एकमेकींना पाहत होत्या. पण कोणीच काही बोलले नाही. क्षणभर घरात शांतता पसरली.
क्रमशः
गूढ वाढत चाललंय.
ReplyDelete