सुनीता आणि रमाकांत इशाकडे बघून मनोमन खुश होते. तेवढ्यात सुनीताने विषय बदलला. " आज पाऊस पडणार बहुतेक... सकाळ पासून काळे ढग दिसत आहेत. वारा पण किती सुटलाय ! "
" इशा , आज संध्याकाळी कांदाभजीचा बेत करू , मस्त गरमा गरम चहा आणि कांदाभजी " - सुनीता
" हो हो, तस ही आज सुट्टी आहे, काही तरी स्पेशल हवेच, मी आईस्क्रीम आणतो, ईशाच्या आवडीचा फ्लेवर... स्ट्रॉबेरी " - रमाकांत
इशाला आई बाबांच्या बोलण्यावरून थोडा अंदाज आलाच, " आई बाबा आपल्या पासून काही तरी लपवत आहे. पण ते एवढे खुश आहेत म्हणजे काही तरी चांगलीच बातमी असणार. " ईशा च्या मनात विचारचक्र सुरु झाले.
दुपारी जेवण झाल्यावर इशा पुन्हा पुस्तक वाचायला बसली. इशाला वाचताना पाहून सुनीता तिथे आली. तिने इशाला विचारलं " काय वाचतेस इशा ? "
" आई, हे खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे. त्यात एका दूरच्या प्रवासातले भन्नाट अनुभव दिलेत आणि काही चमत्कारिक गोष्टी एवढया छान प्रकारे सांगितलंय की मी ही तिकडे पोहोचते. थोडेच वाचून झाले. आताच सुरुवात केली. पण आता पूर्ण वाचूनच काढायचे मला. पूर्ण झालं की तुला सांगते त्यातली स्टोरी. " - इशा
" हो सांग की, पण त्या आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, पुढे काय करायचं ठरवलं तू... पुढची परीक्षा देणार आहेस ना मग तो पर्यन्त काही ठरवले का ? - सुनीता
" हो आई, मला पुढे शिकायचे, मला अस पुस्तक लिहायचंय आणि ते इतरांनी वाचावे हे माझं स्वप्न आहे. मी आता पासूनच त्याची तयारी सुरू केली आई, हे बघ वेगवेगळे कथा संग्रह त्यांची माहिती मी काढून ठेवली. ही सगळी पुस्तक मी वाचून काढणार..." - इशा
सुनीताने ती लिस्ट हातात घेतली आणि इशाला म्हणली " तुझं हे स्वप्न पूर्ण होईलच बाळा... पण त्या आधी तुला तुझी ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देणारा जोडीदार मिळावा अस आम्हाला वाटते. आम्ही तुझ्यासाठी असणारच आहोत पण एकदा तुझं लग्न झालं की आम्हाला ही समाधान मिळेल. आपले हे कुटुंब आणखी मोठे होईल, तुला कळते ना , मी काय म्हणते ते इशा ? - सुनीता
सुनीताने मध्ये मोठा श्वास घेतला. आपल्या भावना ईशा समजून घेईन ना, तिच्या मनात आई बाबा बद्दल गैरसमज तर होणार नाही ना... ईशा यावर कशी प्रतिक्रिया देईल. असे बरेच प्रश्न तेव्हा उभ्या उभ्या सुनीताच्या मनात येत होते. ती ईशाकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा प्रयत्न करत होती. ईशाने सुनीताकडे पाहिले.
" आई...मधेच काय हा लग्नाचा विषय काढतेस, माझे अजून शिक्षण पूर्ण नाही झाले आणि नोकरी पण नाही ... मग मला कोण स्वीकारेल ... तू घाई करतेस ग आई... " - ईशा
" तसे नाही इशा, तुला समोरुन स्थळ येते तर ते तू नाकारू नये, एवढंच आम्हाला वाटतं " - सुनीता
" काय ? म्हणजे ? नीट सांग ना ग आई... " - इशा
" अग आपल्या शेजारी ते रत्नाकर टिळक राहायचे ना आधी, त्यांच्या धाकट्या मुलाचे स्थळ आले तुला... प्रणित नाव त्याचे , तुला आठवतोय का तो ? " - सुनीता
" हो आठवतो आई, पण मी त्याच्याशी नंतर फारसं बोलले नाही, किंवा पुढे संपर्क पण झाला नाही ... अजून त्यांना माझी आठवण कशी काय ? प्रणित तर किती मस्तीखोर होता तेव्हा , आता काय करतो तो ? " - इशा
सगळं कळेल बाळा पण आधी तुझं मत काय ते आम्हाला जाणून घ्यायचे तू तयार असशील तर आपण पुढे चर्चा करू " - सुनीता
" पण आई माझं स्वप्न ? " - इशा
" ती सगळी मंडळी खूप चांगली, शिकलेली, सुजाण आहेत, तुला नक्कीच ते प्रोत्साहन देतील आणि आम्ही तुझ्यासाठी जे योग्य असेल तेच करू " - सुनीता
" इशा आम्हाला तुला आनंदात पहायचे एवढीच आमची दोघांची अपेक्षा आहे , आम्ही कायमस्वरूपी तुझ्या जवळ असणार नाही तेव्हा अडीअडचणीत तुला तुझी एक हक्काची जागा असावी जिथे तुला खूप प्रेम करणारी माणसे मिळावी एवढंच आमचं स्वप्न आहे. " - सुनीता
इशा आणि सुनीताचे बोलणे बराच वेळ सुरू होते. बघता बघता संध्याकाळ झाली. इशाला तिच्या आईचे म्हणणे पटू लागले. तिनेही मनोमन येणाऱ्या नव्या नात्याला होकार दिला. तेव्हा ती काहीच म्हणली नाही. विचार करण्यासाठी थोडा वेळ घेऊन तिने तो विषय तिकडेच थांबवला.
थोडया वेळाने सगळे चहा आणि कांदाभजीचा आस्वाद घेण्यासाठी बाहेरच्या खोलीत येऊन बसले. इशाने ही दुपारी झालेला विषय पुन्हा काढला नाही. पण पुन्हा हा विषय समोर येणारच त्यामुळे तशी मनाची तयारी तिने केलीच होती. रमाकांत आणि सुनीता त्या दिवशी एवढे खुश होते, गेले अनेक दिवस तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर इशाने पाहिला नव्हता.
रात्रीचे जेवण आटोपले आणि इशा तिच्या डायरीत लिहायला बसली. तिनं कोणताही संपर्क नसताना ही प्रणित तिच्या आयुष्यात येण्याआधीचे त्याचे काल्पनिक वर्णन त्या डायरीत करून ठेवले आणि ती झोपली
क्रमशः
आता हळुहळु रंगत येऊ लागली आहे.
ReplyDelete